Monday, January 30, 2023

भारतात राहणार प्रत्येक व्यक्ती हिंदूचं; मोहन भागवत यांचं मोठं विधान

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे असं मोठं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय अंबिकापूर येथे स्वयंसेवकांच्या (संघाचे स्वयंसेवक) कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हिंदू धर्माबद्दल भाष्य केलं आहे.

आम्ही १९२५ पासून म्हणत आलो आहोत की भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. जो भारताला आपली माता मानतो, मातृभूमी मानतो, ज्याला भारतात विविधतेत एकात्मतेची संस्कृती जगायची आहे, मग त्या व्यक्तीची भाषा, आहार आणि प्रथा-परंपरा कुठलीही असो, तो हिंदू आहे असे भागवत म्हणाले

- Advertisement -

हिंदुत्वाने हजारो वर्षांपासून भारताच्या भूमीत सर्व विविधता एकत्र ठेवल्या आहेत, हे सत्य आहे. संपूर्ण जगात हिंदू धर्म ही एकमेव कल्पना आहे, जी सर्वांना सोबत घेऊन जाण्यावर विश्वास ठेवते. भारतात विविधता असूनही आपण सर्व समान आहोत. आपले पूर्वज एकच आहेत. ४० हजार वर्षे जुन्या ‘अखंड भारत’चा भाग असलेल्या प्रत्येक भारतीयाचा DNA सारखाच आहे. असा पुनरुच्चार मोहन भागवत यांनी केला.