हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत चाललेले आहे. अशातच आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे. आणि यामध्ये अनेक छोट्या-छोट्या गोष्टीत बदल करण्यात आलेला आहे. आणि यावर प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक वेगळा क्रमांक देखील असणार आहे. या अपार कार्डमुळे विद्यार्थ्यांची आता एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. तसेच डीजी लॉकरची सोय उपलब्ध करणे करून दिली जाणार आहे. हा उपक्रम एक देश एक विद्यार्थी या संकल्पनेवर आधारित असणार आहे.
अपार कार्ड म्हणजे काय ?
अपार म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री. पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळणार आहे. यावर तुमचा 12 अंकी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला युनिफाईड डिस्ट्रिक्ट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लसमध्ये नोंदणी केली जाणार आहे.
या अपार कार्डद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती ही एकाच ठिकाणी सुरक्षित असणार आहे. डिजिलॉकर मध्ये तुम्ही तुमचे सगळे कागदपत्रे देखील देऊ शकता. याद्वारे जर तुम्हाला पुढील शिक्षणासाठी कोणतेही कागदपत्र लागले, तर ते सहज शोधता येईल. तसेच याद्वारे विद्यार्थ्याला त्याची सर्व कागदपत्रे शाळेत जमा करण्याची गरज नाही. ही सर्व कागदपत्रे डिजी लॉकरमध्ये असणार आहे.
अपार कार्ड कसे बनवायचे ?
प्रत्येक शाळा आता आपार कार्ड बनवण्यासाठी त्यांच्या पालकांची संपर्क साधणार आहे. अपारसाठी यु-डायस नोंदणी नंबर, जन्मतारीख, मोबाईल नंबर, आई-वडिलांची नावे, आधार कार्ड वरील नावे या सगळ्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत. जर विद्यार्थी 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल, तर या संपूर्ण प्रोसेस साठी पालकांची संमती लागणार आहे. त्यानंतर तुमचे अपार कार्ड तयार झाल्यावर ते डीजीलॉकर सोबत कनेक्ट केले जाणार आहेत. जेणेकरून तुमची संपूर्ण शैक्षणिक माहिती एका ठिकाणी सुरक्षित राहील.