Wednesday, June 7, 2023

प्रेमासाठी सर्वकाही…कोल्हापुरातल्या युवकाचा भन्नाट पराक्रम; अडीच किमी रस्त्यावर लिहिले I Love You

कोल्हापूर | प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… मराठी कवींनी प्रेमाचे हे असे वर्णन करून ठेवले आहे. त्यामुळे हे प्रेमवीर प्रेमात प्रेरित होऊन काय काय करतील काही सांगता येत नाही. कोल्हापुरात अशीच एक भन्नाट घटना घडली आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती परिसरातील एका युवकाने जयसिंगपूर-धरणगुत्ती अशा रस्त्यावर साधारण दोन ते अडीच कोलिमीटर रस्त्यावर आय लव्ह यु, आय मिस यु, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असे लिहिले आहे. त्याने रस्त्यावर ऑईलपेंटने हे असे लिहिल्यामुळे सध्या याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

या प्रेमवीराच्या कारनाम्यामुळे तो प्रसिद्ध झाला खरा पण हा प्रेमवीर कोण आहे आणि त्याने हे कुणासाठी लिहिले आहे हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. जयसिंगपूर धरणगुत्ती हा ६ ते ७ किमीचा रस्ता आहे. गावाच्या तीन किमी अलिकडे ‘आय लव यु’ आणि ‘आय मिस यु’ लिखाणाची सुरूवात झाली आहे. तर गाव संपण्याच्या अर्धा किमी आधी हे लिखाण थांबवलेलं आहे. ज्या ठिकाणी रस्त्यावर दोन ते तीन बाह्यवळणे आहेत तिथून प्रवास करताना रस्त्यावर लिहिलेले शब्दे पाहून सर्वच नागरिक अचंबित होत आहेत.

संचारबंदीच्या काळात एक युवक उस्मानाबादहून आपल्या प्रेयसीला भेटायला पाकिस्तानला निघाला होता तर पुण्यात काही दिवसांपूर्वी एका प्रियकराने आपल्या शिवडे नावाच्या प्रेयसीसाठी ठिकठिकाणी फ्लेक्स लावले होते. प्रेमात हे प्रेमवीर काय करतील काही सांगता येत नाही हेच खरे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group