हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आता सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलेल्या मागणीनुसार EVM आणि VVPAT मशीनची पडताळणी करण्यात येणार आहे. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यांची हीच मागणी मान्य करण्यात आली आहे.
सुजय विखे पाटील यांच्या मागणीनंतर केंद्रावर मशीनची मेमरी रिकामी करणपणा मतदान प्रक्रिया म्हणजेच मॉकपोल राबवली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे 4 जूनला लोकसभा निवडणुकीसाठी मजमोजणी पार पडल्यानंतर विखे पार्टी यांनी 10 जून रोजी अहमदनगर मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्याबाबतचा मागणी अर्ज जिल्हा निवडणूक विभागाकडे केला होता.
त्यांनी केलेला हा अर्ज मान्य झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनेच्या आधारावरच ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची तपासणी होणार आहे. या तपासणीमध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्यास त्यावर पुढील कारवाई करण्यात येईल. परंतु सध्या तरी आपली मागणी मान्य झाल्यामुळे सुजय विखे पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे.