महाबळेश्वरच्या वेण्णालेकमध्ये माजी नगराध्यक्षाच्या पतीची आत्महत्या

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद

महाबळेश्वर येथील वेण्णालेकमध्ये महाबळेश्वर नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष यांचे पती दिपक कांदळकर यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. या घटनेने महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. महाबळेश्वर ट्रेकरचे जवान यांच्या मदतीने शोधकार्य सुरु आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर नगरपापलीकेच्या माजी नगराध्यक्ष सौ कांदळकर यांचे पती दिपक कांदळकर यांनी वेण्णालेकच्या बाहेर आपले जॅकेट व चप्पल काढुन वेण्णालेकमध्ये उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. कांदळकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे.

दरम्यान, घटनास्थळी महाबळेश्वर ट्रकरचे जवान दाखल झाले आहेत. वेण्णा लेक परिसरात शोधकार्य सुरु आहे. कांदळकर यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नसून पुढील तपास सातारा पोलिस करत आहेत.

You might also like