चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांना सीबीआयकडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ICICI बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर (chanda kochhar) आणि त्यांचे पती दीपक कोचर सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. चंदा कोचर (chanda kochhar) यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर (chanda kochhar) करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
व्हिडिओकॉन ग्रुपला 2012मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून तीन हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. त्यानंतर या कंपनीचे प्रवर्कत वेणूगोपाल धूत यांनी न्यूपॉवर कंपनीत कथिक कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. आरोपींनी इतरांसोबत गुन्हेगारी कट रचून खासगी कंपन्यांना कर्जे मंजूर केल्याचा आरोप आहे. यातून आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक केल्याचे सीबीआयने सांगितले आहे. या प्रकरणी सीबीआयने 2019 मध्ये एफआयआर दाखल केला होता.

सीबीआयने या प्रकरणात चंदा कोचर (chanda kochhar), दीपक कोचर, व्हिडिओकॉन ग्रुपचे वेणूगोपाल धूत यांच्यासह न्यूपॉवर रिन्यूएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रिज लिमिटेड यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेतील गुन्हेगारी कटाचे कलम; तसेच आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यातील कलमे लावण्यात आली आहेत.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या