नववर्ष आगमन : उत्पादन शुल्कची दोन ठिकाणी अवैध दारू वाहतूकीवर कारवाई, दोघे ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | मलकापुर, चचेगांव (ता. कराड) या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कार्यवाहीत देशी मद्याच्या एकुण 240 सिलबंद बाटल्या तसेच बिअर 500 मिली क्षमतेच्या एकुण 144 सिलबंद कॅन मिळून आले. या कारवाईत 2 चारचाकी वाहनांसह 1 लाख 95 हजार 960 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित हे साकुर्डी व मलकापूर येथील आहेत.

उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, कारवाईत संशयित आरोपी दिपक बबलु कांबळे (रा. साकुर्डी ता. कराड जि. सातारा), मुस्तफा मोहिद्दीन मणियार (रा. लक्ष्मीनगर मलकापुर ता. कराड जि. सातारा) असे दोन इसम मिळून आले. मिळून आलेल्या इसमांकडून 2 चारचाकी वाहनासह अंदाजे रु.1,95,960/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासकामी संशयीत इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांचे आदेशानूसार तसेच अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आज शुक्रवारी दि. 31/12/2021 रोजी नववर्षे आगमन या पार्श्वभूमीवर अवैद्य मद्याची वाहतूक होणार असल्याच्या शक्यतेने गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई निरीक्षक एस. एस. साळवे, एस. बी. जंगम, सहा दु. नि. एन. के. जाधव व जवान व्ही. व्ही. बनसोडे, बी. एस. माळी, एस. बी. जाधव यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक एस. एस. साळवे करीत आहेत.

Leave a Comment