अज्ञात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जालना महामार्गावरून गोलटगावकडे जाणाऱ्या जोड रस्त्यावर हसनाबादवाडी शिवारात आज सकाळी एका तिशीतील युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या युवकाच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमेचे व्रण असल्याने हा घात की अपघात अशी स्थिती असून करमाड पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे.

आज सकाळी करमाड पोलिसांना खबर मिळाली की, एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गोलटगावला जाणाऱ्या रस्त्यालगत बेवारस स्थितीत पडून आहे. करमाड पोलीस ठाण्याचेपोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

दरम्यान, प्राथमिकदृष्ट्या या युवकाच्या अंगावर ठिकठिकाणी जखमेचे व्रण आढळून आल्याने हा घातपाताचा प्रकार वाटतो. तथापि अधिक माहिती व मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच अधिक बोलणे उचित होईल असे करमाड पोलिसांकडून सांगण्यात आले. तरुणास कोणी ओळखत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करमाड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment