खळबळजनक! हवालदाराची, गुन्हेगाराच्या बहिणीकडे मदतीच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी! बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे | लोक आपण करत असलेल्या मदतीच्या बदल्यात काय मागणी ठेवतील हे कोणालाही सांगता येणार नाही. किव्वा आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मदत करत असल्याचे खोटे नाटकही करतील. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. एका गुन्ह्यात अटक झालेल्या गुन्हेगाराला मदत करतो असे सांगत गुन्हेगाराच्या बहिणीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. असा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात दादाराम या नावाचे पोलिस कर्मचारी हवालदार या पदावर कार्यरत आहेत. स्वारगेट पोलिस ठाण्यात एका गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्या गुन्ह्याच्या संदर्भात पोलिस हवालदाराने गुन्हेगाराच्या बहिणीशी संपर्क केला. मोबाइल नंबर घेतला. ओळख वाढवली आणि रोज तिच्याशी फोनवर बोलत राहिला.

24 डिसेंबर 2020 रोजी तरुणीच्या लग्नासाठी एक स्थळ आणल्याचे नाटक करून, तरुणीला पुणे स्टेशन परिसरात असलेल्या एका लॉजवर घेऊन गेला. हे सर्व नाटक तरुणीच्या लक्षात आल्यानंतर त्याने तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली. तरुणीने हवालदाराची तक्रार बंडगार्डन पोलिस ठाण्यात नोंदवल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like