Exercise Pill | आता जिमला जाण्याची चिंता मिटली, व्यायामाची गोळी खाऊन घरच्या घरी राहा फिट

Exercise Pill
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Exercise Pill | बदलत्या जीवनशैलीनुसारआपले राहणीमान देखील खूप बदलले आहे. या सगळ्या धावपळीत आपल्या आरोग्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. आजकाल फिट राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक जिमला जातात, ट्रेकींगला जातात. परंतु काही लोकांना हा व्यायाम करण्याचा खूप कंटाळा येतो .रोज त्यांना उठून जिमला जायला तसेच पळायला जाणे आहे अजिबात आवडत नाही. परंतु जर अशी जादू झाली आणि जर व्यायामाची गोळी आली तर??? तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? व्यायामाची कुठे गोळी असते का? परंतु हे आता खरे होणार आहे. ते म्हणजे अमेरिकेतील वैज्ञानिकांनी आता अशी एक गोळी शोधून काढली आहे. त्याला व्यायामाची गोळी (Exercise Pill) असे म्हणतात. जी खाल्ल्यावर आपल्या शरीरामध्ये अगदी तसेच बदल घडणार आहेत जे बदल व्यायाम केल्यानंतर घडतात, असा त्या वैज्ञानिकांनी दावा देखील केलेला आहे.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी ही गोळी तयार केलेली आहे. यावेळी त्यांनी माहिती दिली की, या गोळीचे अपेक्षित असे परिणाम त्यांना उंदरावर दिसले आहे. त्यांनी उंदरांना ही गोळी दिली. त्यानंतर उंदराच्या शरीरातील मेटाबोलिझम अगदी तसंच बदललं, जसं व्यायाम केल्यानंतर बदलतं. त्याचप्रमाणे ही गोळी घेतल्यानंतर उंदरांच्या मांसपेशींची ताकद देखील वाढली आणि त्यांचा फिटनेस वाढवून शारीरिक क्षमताही सुधारली.

वैज्ञानिकांनी बनवलेल्या या गोळीचे (Exercise Pill) रासायनिक नाव SLU – PP-332 असे आहे. या गोळीचा उंदरावर चांगला परिणाम झालेला दिसला आहे. परंतु त्याचप्रमाणे जर माणसांमध्येही असाच बदल घडला तर हा एक मोठा इतिहासिक शोध असणार आहे. या गोळीचा वापर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी देखील होऊ शकतो. असे देखील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

गोळी कशी काम करते | Exercise Pill

ज्यावेळी आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरातील एक्स्ट्रोजन रिलेटेड रिसेप्टर हे कार्य करतात. हे रिसेप्टर्स मांसपेशी, हृदय, मेंदूमध्ये देखील आढळतात. मेटाबॉलीजम, इन्फ्लेमेशन, होमोयोस्टेसिस शारीरिक विकास, कोशिकांची वाढ त्याचप्रमाणे कोशिकांचा रिप्रोडक्शनसाठी हे रिसेप्टर काम करतात.

मानवी चाचणीसाठी परवानगी मागितली

एलगेंडी यांनी सांगितले की, हे औषध बनवायच्या आधी आम्ही एक स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. पेलाजो फार्मोस्टिकल नावाच्या या कंपनीने हे औषध तयार केले आहे. या गोळीची उंदरांवर चाचणी यशस्वी झाली आहे. आणि आता त्याला आम्ही क्लिनिकल ट्रायलची परवानगी देखील मागितलेली आहे.

शास्त्रज्ञांच्या मते ही गोळी उंदराला एकदाच दिली आणि त्यानंतर त्यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये जवळपास 70 टक्के वाढ झालेली आहे. दुसऱ्यांदा ही गोळी घेतल्यानंतर त्यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये 100 टक्के वाढ झालेली आहे. ही गोळी व्यायामाची जागा घेऊ शकणार नाही. परंतु व्यायामाचे फायदे ही गोळी खाऊन मिळतात. त्यामुळे ही गोळी खाऊन अगदीच व्यायाम बंद करणे चुकीचे आहे.