हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल लठ्ठपणा ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सामान्यता जे लोक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतात. ते दिवसभर खुर्चीवर बसून काम करतात. त्यामुळे तासंतास खुर्चीवर बसल्याने त्यांना अनेक आजार देखील होतात. लठ्ठपणामुळे आपण अनेक आजारांना बळी देखील पडतो. परंतु एकीकडे ऑफिस आणि दुसरीकडे घर सांभाळून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो. दिवसभर लॅपटॉप आणि कम्प्युटरवर काम केल्याने शारीरिक हालचाली खूप कमी होतात. त्यामुळे फिटनेससाठी वेळ देखील मिळत नाही.
अनेक लोकांना वाटते की, फिटनेससाठी जिममध्ये जाणे खूप गरजेचे आहे. परंतु तुम्ही अगदी साधा सोपा व्यायाम करूनही फिट राहू शकता. आता तुम्ही ऑफिसच्या वेळामध्ये किंवा घरी मोकळ्या वेळात अगदी साधे व्यायाम करून देखील फिट राहू शकता. आता ते कोणते व्यायाम आहेत हे आपण पाहूयात?
सीटेड लेग रेज
तुम्ही अगदी ऑफिसमध्ये देखील हा व्यायाम करू शकता. हा व्यायाम करण्यासाठी तुम्ही ऑफिसच्या खुर्चीवर सरळ बसा. त्यानंतर तुमचा डावा पाय सरळ ठेवा, तुम्ही दहा सेकंद या स्थितीत ठेवा. नंतर अगदी सेम उजव्या पायाने करा दोन्ही पायांसाठी तुम्ही पंधरा वेळा पुनरावृत्ती करा.
चेअर डिप्स
हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला चेअरची देखील गरज लागणार नाही. हा व्यायाम सुरू करण्यासाठी तुम्ही दोन्ही हातांनी खुर्चीचे हँडल धरा. आता खुर्चीवरून शरीर उचलण्यासाठी कोर आणि हात वापरा. शरीर थोडे पुढे सरकावा आणि नंतर खाली आणा. अशा प्रकारे तुम्ही दहा ते पंधरा वेळा याची पुनरावृत्ती करू शकता.
चेअर पुश अप्स
तुम्ही ऑफिसमध्ये असताना ऑफिसच्या चेअरवर देखील हे करू शकता. यासाठी तुम्ही आपले शरीर आपल्या हातांनी वर उचला आणि नंतर खाली घ्या. तुम्हाला दिवसा वेळ मिळेल तेव्हा दहा ते पंधरा वेळा हा व्यायाम करू शकता.
ऑफिस चेअर स्क्वॉट्स
डेस्कवर बसून देखील तुम्ही हा व्यायाम करू शकता. यासाठी तुम्ही बसताना दोन्ही हात खांद्याच्या पातळीवर ठेवून लांब करा. आणि नंतर वर धरा. या स्थितीत तुम्ही खुर्चीपासून किमान एक इंच वर असले पाहिजे. काही सेकंदासाठी तुम्ही स्वतःला होल्ड करा आणि नंतर बसा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दहा ते पंधरा वेळा हे करू शकता.