हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारताची आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ (Jio) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवीन आणि किफायतशीर योजना सादर करत असते. उत्तम नेटवर्क सेवा आणि परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅन्समुळे (Recharge Plans) जिओने मोठा ग्राहकवर्ग निर्माण केला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत डेटा आणि कॉलिंग प्लॅन्सच्या किमती वाढल्याने ग्राहकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागत आहे.
त्यामुळेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या नवीन नियमांचे पालन करत जिओने 2025 साठी स्वतंत्र कॉलिंग रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. या प्लॅन्समध्ये केवळ अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस सेवा उपलब्ध आहेत. परंतु, इंटरनेट डेटा समाविष्ट नाही. त्यामुळे फक्त कॉलिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
जिओचे नवीन कॉलिंग प्लॅन्स
84 दिवसांचा कॉलिंग रिचार्ज प्लॅन – 497
वैधता: 84 दिवस
सेवा: अमर्यादित कॉलिंग आणि 1000 मोफत एसएमएस
डेटा सुविधा: नाही
365 दिवसांचा (1 वर्ष) कॉलिंग रिचार्ज प्लॅन – 1998
वैधता: 365 दिवस (1 वर्ष)
सेवा: अमर्यादित कॉलिंग आणि 3600 मोफत एसएमएस
डेटा सुविधा: नाही
कोणाला होईल फायदा?
- – ज्यांना इंटरनेट डेटा वापरण्याची गरज नाही, अशा ग्राहकांसाठी हे प्लॅन्स फायदेशीर आहेत.
- – मोबाईलचा उपयोग फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी करणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर.
- – दुय्यम सिमकार्ड वापरणारे ग्राहक, ज्यांना इंटरनेटची फारशी गरज नाही, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे.
- – दीर्घकालीन वैधतेच्या प्लॅन्समुळे वारंवार रिचार्ज करावा लागणार नाही.
दरम्यान, टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे जिओ सतत नवे प्लॅन्स आणून ग्राहकांना आकर्षित करत आहे. नवीन कॉलिंग प्लॅन्समुळे जिओला मोठ्या प्रमाणावर नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. यासह अन्य टेलिकॉम कंपन्याही अशा योजनांची घोषणा करण्याची शक्यता आहे. जिओचे हे नवीन कॉलिंग रिचार्ज प्लॅन्स डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.