दारू पिणे पडले महागात ः सहाजणांनी कोयता गळ्याला लावून दोन लाख केले लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शिवथर (ता. सातारा) गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसलेल्या दोघांना सहाजणांनी गळ्याला कोयता लावून 1 लाख 73 हजारांची रोकड, मोबाईल, किंमती घड्याळ असा एकूण 2 लाख रूपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबतची सातारा तालुका पोलीस ठाण्यात अजित शिवाजी निकम (वय 43, मूळ रा. तडवळे संमत कोरेगाव, सध्या रा. रामडोह आळी, वाई यांनी) तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहीती अशी,  दि. 18 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास धोम डाव्या कालव्यालगत मद्यापान करण्यासाठी तक्रारदार अजित निकम व त्यांचा मित्र अमित अशोक साबळे हे शिवथर गावच्या हद्दीत बसले होते. त्यावेळी तिथे अचानकपणे दोन मोटारसायकलवरुन सहाजण 20 ते 25 वयोगटातील युवक तिथे आले. त्यांनी अजित निकम यांच्या डोक्यात कोयत्याची मूठ मारली तर अमित साबळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी चोरट्यांनी अमित साबळे यांच्या गळ्याला कोयता लावून त्यांना जिवे मारण्याचा धाक दाखवून निकम यांच्याकडे असलेली रोख रक्कम 1 लाख 73 हजार, दोन मोबाईल, घड्याळ असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला.

या घटनेची तक्रार अजित निकम यांनी (दि. 20) सातारा तालुका पोलीस ठाण्यात जावून अज्ञात सहा चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली असून तपासाबाबत त्यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या. सहाजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर दळवी हे अधिक तपास करत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment