सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
किसनवीर साखर कारखाना भुईंज येथे मध्यरात्रीच्या सुमारास हवेच्या प्रेशर मुळे अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात एकूण 4 जण जखमी झाले असून 2 जण किरकोळ जखमी आहेत. या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
मिळालेली माहिती अशी, सध्या ऊस गाळप हंगाम सुरू आहे. त्यामुळे रात्रीचेही काम सुरू असते. रात्रपाळीस काम सुरू असताना मध्यरात्री हवेच्या प्रेशरमुळे अचानक मोठा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार वाॅक लीक झाल्याचे समजत आहे. या अपघातातील जखमी कर्मचाऱ्यांना साताऱ्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमींचा खर्च कारखाना करणार
किसनवीर साखर कारखन्यात झालेल्या स्फोटात कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांचा खर्च किसनवीर साखर कारखाना करणार आहे, अशी माहिती किसनवीर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.