वाळूज एमआयडीसी भागात गॅस सिलिंडरचा स्फोट; चार गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – उद्योगनगरी वाळूज एमआयडीसी मधील प्रभाकर इंजीनियरिंग च्या समोरील शेडमध्ये दुचाकीच्या सायलेन्सरला वेल्डिंग करत असताना गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला असून, यात वेल्डर, दुचाकी चालक आणि इतर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, रांजणगाव चौकात असद चाऊस यांचे प्रभाकर इंजिनियरिंगचा समोर गॅस वेल्डिंगचे शेड आहे. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुनील देवरे आपल्या दुचाकीच्या सायलेन्सरला वेल्डिंग करण्यासाठी असद यांच्या शेडमध्ये आले. दरम्यान वेल्डिंग सुरू असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात वेल्डरस दुचाकीचालक सुनील देवरे शेजारील शेख चांद आणि गणेश हे गंभीर जखमी झाले आहेत.

पायाचा पंजा 50 फूट दूर आढळला !
हा स्फोट एवढा भीषण होता की बिल्डर असद यांच्या पायाचा तुटलेला पंजाब 50 फूट दूर आढळून आला. स्फोटाच्या ठिकाणी वाहनाचे आणि सिलेंडरचे विखुरलेले तुकडे आढळून आले. यासोबतच दुचाकी चालक आणि शेजारील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.‌

Leave a Comment