हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे भारत विकासाच्या प्रगतीपथावर जाताना दिसून येत आहे. यामध्ये सर्वात मोठा हिस्सा म्हणजे एक्सप्रेसवे. भारतात ठिकठिकाणी एक्सप्रेसवे (Expressway In India) बनवले जात आहेत. या एक्सप्रेसवेमुळे वाहतुकीला चालना मिळत आहे. तसेच आता भारतात असे 8 एक्सप्रेसवे बनवले जाणार आहेत ज्यामुळे देशाच्या कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे. कोणते आहेत हे एक्सप्रेसवे जाणून घेऊयात.
कोणते आहेत एक्सप्रेसवे? Expressway In India
–
1) दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग-
दिल्ली – मुंबई एक्सप्रेसवे हा येणाऱ्या वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये पूर्ण होणार असून यामुळे मुंबई – दिल्ली च्या प्रवासासाठी चालना मिळणार आहे. तसेच दोन्ही शहरातील अंतर हे केवळ 12.5 तासांपर्यंत कमी होणार आहे. या मार्गाची लांबी एकूण 1350 किमी पेक्षा जास्त आहे. या एक्सप्रेसवेमुळे वाहतुकीस चालना मिळेलच तसेच पर्यटनासही चालना मिळेल.
2) गंगा एक्सप्रेसवे-
गंगा हा एक्सप्रेसवे हा मेरठ ते प्रयागराज या मार्गाला जोडला जाणार आहे. या महामार्गाच्या निर्मितीमुळे 594 किमीपेक्षा जास्त असलेल्या प्रवासाचा वेळ हा 6 तासांपर्यंत कमी होईल. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा मार्ग 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. या एक्स्प्रेसवेला एकूण 12 पॅकेजेसमध्ये विभागण्यात आले आहे. ज्यामध्ये 594 किमीवर 18 फ्लायओव्हर आणि आठ रोड-ओव्हर ब्रिज बांधण्यात आले आहेत. तसेच टोल प्लाझाचे 12 रॅम्पही बांधले जाणार आहेत. त्यामुळे हा एक्सप्रेसवे महत्वाचा मानला जात आहे.
3) दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे-
दिल्ली- अमृतसर- कटरा एक्सप्रेसवेमुळे (Expressway In India) पर्यटनाला चालना मिळणार आहे. हा मार्ग धार्मिक ठिकाणी जोडला जाणार असल्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा पूर झाला असून हा मार्ग दिल्ली ते कटरा 650 किमी पेक्षा जास्त अंतराला जोडेल आणि वैद्यकीय सुविधा देईल.
4) अहमदाबाद- धोलेरा द्रुतगती मार्ग
अहमदाबाद- धोलेरा द्रुतगती मार्ग हा 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा मार्ग एकूण 109 किमीचा आहे. या एक्सप्रेसवेमुळे सरदार पटेल रिंगरोड ते ढोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडले जाणार आहे. तसेच महामार्गामुळे DMIC ची सोय होईल. NHAI ने अहमदाबाद-धोलेरा एक्स्प्रेसवेच्या बांधकामाची चार पॅकेजेसमध्ये विभागणी केली आहे. या एक्सप्रेसवेसाठी तब्बल (जमिनीची किंमत वगळून) सुमारे 3,196 कोटी रुपयांचा खर्च आहे.
5) बंगलोर-चेन्नई द्रुतगती मार्ग
या एक्सप्रेसवेच्या निर्मितीमुळे बेंगळुरू आणि चेन्नईमधील अंतर 50 किलोमीटरने कमी होईल. हा द्रूतगती महामार्ग 260 किलोमीटरवर पसरला आहे. या मार्गाचे उद्दिष्ट हे देशाची कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे आहे.
6) रायपूर-विशाखापट्टणम द्रुतगती मार्ग
रायपूर-विशाखापट्टणम द्रुतगती मार्ग हा 2025 पर्यंत तयार होणार आहे. हा मार्ग 464 किलोमीटरचा असून 6 – लेन एक्सप्रेसवे आहे. हा मार्ग छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून जाणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ 14 वरून 7 तासावर होणार आहे. हा रायपूर-विशाखापट्टणम कॉरिडॉरचा एक भाग आहे.
7) लखनौ-कानपूर एक्सप्रेसवे
लखनौ आणि कानपूर एक्सप्रेसवे हा 62 किमीचा असून एकूण 6 लेनचा एक्सप्रेसवे आहे. हा एक्सप्रेसवे 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.
8) गोरखपूर शामली एक्सप्रेसवे
गोरखपूर-शामली कॉरिडॉर हा उत्तर प्रदेशचा तिसरा सर्वात मोठा ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे असणार आहे. हा एक्सप्रेसवे पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशला जोडणारा 700 किमीचा प्रस्तावित मार्ग आहे. तसेच हा महामार्ग भारत-नेपाळ सीमेजवळून जाणार आहे. सीमेच्या आसपासच्या भागात रस्ते संपर्क वाढवण्याच्या योजनेवर काम सुरू झाले आहे. या द्रूतगती महामार्गासाठी 35,000 कोटी खर्चाचा अंदाज आहे.