आता लॉकडाऊनसुद्धा म्हणतंय..तारीख पें तारीख..!! देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला

नवी दिल्ली । तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा सनी देओलचा डायलॉग आता भारतीयांना चांगलाच लक्षात राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगभरातील लोकांना आपल्या तालावर नाचायला लावलेलं असताना भारतात सव्वा महिने वाढलेला लॉकडाऊन आणखी २ आठवडे वाढला आहे. ३ मे रोजी संपणारा दुसरा लॉकडाऊन आता १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असून याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आली आहे.

दुसरा लॉकडाऊन संपायच्या आधीच २ दिवस ही घोषणा करण्यात आली असून आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी एक चान्स मात्र यावेळी देण्यात आला आहे. परप्रांतीय नागरिक तसेच राज्यांतर्गत अडकलेल्या नागरिकांना आपापल्या गावी जाण्यासाठी वाहनांची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून ३ मे ते ७ मे या कालावधीपर्यंत ही वाहतूक व्यवस्था कार्यान्वित राहील असा प्राथमिक अंदाज आहे.

कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन्सचं नियोजन करण्यात आलं असून कामगारांना इच्छित ठिकाणी पोहचवल्यानंतर त्या राज्यातील सरकारकडून त्यांची जबाबदारी घेण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनला प्रवासी उतरल्यानंतर त्यांना सॅनिटायझ आणि क्वारंटाईन करनं गरजेचं असल्याचं या तरतुदीत नमूद करण्यात आलं आहे.

You might also like