भाजी विक्रीसाठी वेळ वाढवून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरामध्ये डेटा प्लसचा संसर्ग रोकण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. त्याअंतर्गत सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजेपासूनते 4 वाजेपर्यंत सर्व दुकाने चालू ठेवण्याची मुभा आहे. त्यामध्ये आठवडी बाजार देखील चालू ठेवण्याची मुभा आहे. मात्र या निर्णयावर भाजी विक्रेते नाराज असून, पीर बाजार येथील भाजी विक्रेत्यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

हॅलो महाराष्ट्रने भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या – ते म्हणाले ‘लॉकडाऊनमुळे पहिलेच नुकसान झालेले आहे. अशात विक्रीसाठी कमी वेळ असल्याने आणलेली भाजी न विकता परत घरी न्यावी लागते. आणि घरी नेली की भाजीची नासधूस होते. बाजारामध्ये येताच 100 रुपयाची पावती फडावी लागते त्याचा खर्चही निघत नाही. पैसे व्याजाने काढून आम्ही भाजी घेतो आणि वेळ झाली की भाजी न विकता घरी परतावे लागते’. अशा व्यथा भाजी विक्रेत्यांनी मांडल्या.

याबाबत प्रशासनाने काहीतरी मार्ग काढावा आणि भाजी विक्रीसाठी वेळ वाढवून द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजी विक्रेत्यांनी दिला आहे.

Leave a Comment