हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Extra Marital Affairs । भारतात मागच्या काही दिवसापासून अनैतिक संबंधांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे तरी अफेयर्स आणि त्यातून होणाऱ्या खुनाच्या घटना बघायला मिळतायत. खास करून लग्नानंतर महिलांच्या अफेअर्स च्या गोष्टी चांगल्याच वाढलेल्या आहेत. घरात नवरा असतानाही दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध ठेवताना या महिलांना कसलीच भीती वाटत नाही. यामुळे देशाचं नाव सुद्धा खराब होत आहे. परंतु तुम्हाला माहितेय का? भारतातील कोणत्या शहरात सर्वात जास्त अनैतिक संबंधाच्या घटना घडतायत?? हे काय मुंबई, दिल्ली, बंगळुरू सारखं मोठं शहर नाही… तर तामिळनाडू राज्यातील एक लहान शहर आहे. आकाराने आणि लोकसंख्येने जरी लहान असलं तरी लफडेबाजीत मात्र हे शहर देशात टॉपला आहे.
आम्ही तुम्हाला ज्या शहराबद्दल सांगतोय त्याच नाव आहे कांचीपुरम…. विवाहबाह्य संबंधात (Extra Marital Affairs) हे शहर अग्रस्थानी आहे. डेटिंग वेबसाइट अॅशले मॅडिसनच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये कांचीपुरम १७ व्या स्थानावर होते, परंतु यावर्षी ते अचानक पहिल्या क्रमांकावर आले आहे. इथली सनम हि बेवफाच असते असं एकूण चित्र आहे.. त्यामुळे याठिकाणची महिला असो वा पुरुष लग्नानंतर अनैतिक संबंध ठेवण्याचे प्रमाण देशात एक नंबरला आहे. खरं तर मागच्या वर्षी या यादीत मुंबईचा पहिला क्रमांक होता, मात्र आता पण यावेळी मुंबईचे नाव टॉप 20 यादीतही नाही हि महाराष्ट्रासाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
लफडेबाजीत कोणकोणत्या शहरांचा समावेश –
कांचीपुरम
मध्य दिल्ली
गुरुग्राम
गौतम बुद्ध नगर
दक्षिण पश्चिम दिल्ली
डेहराडून
पूर्व दिल्ली
पुणे
बेंगळुरू
दक्षिण दिल्ली
चंदीगड
लखनऊ
कोलकाता
पश्चिम दिल्ली
कामरूप (आसाम)
उत्तर पश्चिम दिल्ली
रायगड
हैदराबाद
गाझियाबाद
जयपूर
अनैतिक संबंध का वाढलेत?
आजकाल अनैतिक संबंध (Extra Marital Affairs) वाढण्यामागे काही कारणे आहेत. मनाविरुद्ध लग्न करणे, नवऱ्याला असलेले व्यसन, शारीरिक आणि मानसिक त्रास, जुने प्रेमप्रकरण, पैशासाठी इतर पुरुषासोबत संबंध प्रस्तावित ठेवणे, अशा अनेक कारणांनी आजकाल देशातील अनैतिक संबंधांच्या घटना वाढत आहेत. कायद्यानुसार, विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही. सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये आयपीसीचे कलम 497 हे असंवैधानिक घोषित केले. आणि प्रौढांमधील संमतीने झालेले संबंध गुन्हा मानले जाऊ शकत नाहीत, असे नमूद केले. मात्र, हे संबंध घटस्फोटाचे निमित्त ठरू शकते.




