प्रेम प्रकरण लपवणे पडले महागात..लफडेबाज नवऱ्याला डॉक्टर तरुणीने ‘असा’ शिकविला धडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | सात वर्षे चाललेले प्रेम प्रकरण लपवून परभणीच्या तरुणाने शहरातील गारखेडा येथील एका डॉक्टर तरूणी सोबत लग्न केले. अंगठ्या, सोन्याचे दागिने, चांगल्या हॉटेलमध्ये लग्न लावून देण्याची अटही पूर्ण करून घेतली. मात्र आपल्या पतीचे आधी प्रेम प्रकरण असून त्याने आपल्याला फसवल्याचे डॉक्टर तरुणीला कळाले. त्यामुळे ती पतीपासून वेगळी झाली. तसेच या 27 वर्षीय तरुणीने पोलिसात जाऊन लग्न जमवून ते लग्नात मागणी पूर्ण करून घेणाऱ्या अशा 13 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी, बी.डी.एस. चे शिक्षण झालेली औरंगाबाद येथील डॉक्टर तरुणी कुटुंबासह गारखेड्यात राहते. जून 2020 मध्ये सचिन विठ्ठल ठोंबरे वय (32) या तरुणाचे तिच्यासाठी स्थळ आले. हे स्थळ मुलीच्या कुटुंबीयांना पसंत पडले. मात्र लग्नाचा सगळा खर्च, एक तोळ्याची अंगठी, चांगल्या हॉटेलमध्ये लग्न लावून देण्याची अट सचिनच्या कुटुंबाने घातली. ती मान्य करत मुलीच्या कुटुंबीयांनी 2 ऑगस्ट रोजी ए.एस. क्लबमध्ये जवळपास पंधरा लाख रुपये खर्च करून लग्न थाटात लावून दिले. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहत असताना पहिल्याच रात्री सदर डॉक्टर तरुणीला एका अज्ञात महिलेने सचिन सोबतचे आपले खासगी फोटो पाठवले. हे पाहून डॉक्टर तरुणीला धक्काच बसला. तिने सचिनला जाब विचारला, त्यावर त्याने ‘हा माझा भूतकाळ आहे. तू तुझे तोंड उघडू नको’ असे सांगून धमकावत गप्प बसण्यास सांगितले.

डॉक्टर सुनेने आपल्या सासू-सासर्‍यांना हा प्रकार सांगितला. त्यांनीही तिला गप्प राहण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर या प्रकरणाची माहिती बाहेर गेली तर तुझ्या आई वडिलांना त्रास होईल, असे धमकावले. मात्र न घाबरता सदर तरुणीने माहेरच्या लोकांना हा प्रकार सांगितला. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी आपल्या मुलीला तात्काळ औरंगाबादला आणले. मात्र भामट्या सचिनला अद्दल घडवण्याचा निर्धार डॉक्टर तरुणीने केला. पुंडलिकनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांची भेट घेऊन तिने हा प्रकार सांगितला. सचिन, त्याचे वडील विठ्ठल, आई शोभा सह मित्र नितीन व प्रेयसी हेमा अशा 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

औरंगाबादसह राज्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा. 9067427423 या नंबरवर आम्हाला Whatsapp करा आणि लिहा HelloNews

Leave a Comment