हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | डोळे हा आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील अवयव आहे. अशातच आफ्रिकेमध्ये डोळ्यांच्या संबंधित एक आजार समोर आलेला आहे. तो म्हणजे आफ्रिकेच्या काही भागात लोकांचा डोळ्यातून रक्तस्त्राव होण्याची प्रकरणे समोर आलेली आहेत. याला रक्तस्त्राव डोळा असे नाव पडलेले आहे. कारण विषाणूची लागण झाल्यानंतर रुग्णांचे डोळे पूर्णपणे लाल होतात. आणि डोळ्यातून रक्त येण्याची प्रकरणे देखील समोर आलेकी आहेत. हा आजार मारबर्ग या विषाणूमुळे झालेला आहे. या विषाणूचा आपल्या शरीरात शिरकाव झाल्यानंतर अनेक लक्षणे दिसतात. त्यातील डोळा लाल होणे हे एक प्रमुख लक्षण आहे. आफ्रिकेमध्ये या विषाणूमुळे आजाराची प्रकरणे वाढत चाललेली आहेत. आणि मृत्यूचे प्रमाण जवळपास 50 ते 80 टक्के आहे. त्यामुळे या आजाराकडे अत्यंत गंभीर दृष्टीने पाहिले जात आहे. या आजाराची लक्षणे जर तीव्र स्वरूपात असेल, तर आठ ते नऊ दिवसातच रुग्णांचा मृत्यू देखील होतो.
आफ्रिकेत सध्या मारबर्ग या विषाणूची प्रकरणे मोठ्या प्रमाणात झालेली आहे. लागण झालेल्या 66 पैकी 15 रुग्णांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. पूर्वी मृत्यूचे प्रमाण एक 44 ते 88 टक्के होते. या विषाणूची लागण झाल्यावर सगळ्यात आधी ताप येतो. त्यानंतर हा विषाणू हळूहळू संपूर्ण आणि शरीरात पसरत4 आणि रोगप्रतिकारशक्तीवर देखील याचा परिणाम होतो. यामुळे शरीराच्या कोणतेही भागातून रक्तस्त्राव होऊ शकतो.
याबद्दल डॉक्टरांनी सांगितले आहे की, मारबर्ग या विषाणूची जर लागण झाली, तर रुग्णाच्या शरीराच्या एखाद्या भागातून रक्तस्त्राव सुरू झाला, तर रुग्णाचा जीव वाचवणे कठीण होते. या नंतर आठ ते नऊ दिवसात रुग्णांचा मृत्यू देखील होऊ शकतो. हा विषाणू संक्रमित वटवाघुळांची लाळ, मूत्र आणि विष्ठेमध्ये आढळतो. हा रोग एखाद्या व्यक्तीमध्ये पसरला तर त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये देखील पसरू शकतो. हा विषाणू लाळ रक्त तसेच आपण वापरलेली वस्तू दुसऱ्या व्यक्तीने वापरल्यावर पसरू शकतो.
सध्या मारबर्ग या विषाणूवर कोणत्याही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही. तसेच कोणती लस देखील उपलब्ध नाही. केवळ रुग्णांना दिसणाऱ्या लक्षणांवरून त्याच्यावर उपचार केले जातात. जर वेळेवर त्या रुग्णाला उपचार मिळाले नाही, तर त्याचा जीव धोक्यात असतो.
कोणती काळजी घ्यावी ?
- आफ्रिकन देशांमध्ये प्रवास करण्यात टाळा
- वरील लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचे उपचार चालू करा.
- घरातील स्वच्छतेची काळजी घ्या.