फेसबुक देत आहे विना गॅरेंटी 50 लाखांपर्यंतचे लोन; असा करा ऑनलाइन अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आपल्यापैकी बरेच जण आपले फोटो, व्हिडिओ आणि विचार शेअर करण्यासाठी Facebook वापरतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की फेसबुकवरून तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता? होय, तुम्ही कोणत्याही गॅरेंटी शिवाय Facebook वरून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता.

Facebook ने Small Business Loans Initiative सुरू केला आहे. यासाठी त्यांनी Indifi सोबत पार्टनरशिप केली आहे. यापूर्वी फेसबुकने केवळ 200 शहरांमध्ये लोन सर्व्हिस सुरू केली होती आणि आता ती 329 शहरांमध्ये विस्तारली आहे. कर्ज घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जात नाही. या लोनसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

तुम्हाला किती लोन मिळेल ?
फेसबुक किंवा मेटा स्वतः लोन देत नाही तर हे लोन Indifi ही कंपनी देते. याद्वारे तुम्हाला 2 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळू शकते. या लोनसाठी तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. मात्र या लोनवर तुम्हांला 17 ते 20 टक्के वार्षिक व्याज भरावे लागेल. महिला उद्योजकांना व्याजदरात 0.2% सूट मिळेल. एकदा तुमचे लोन मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला फक्त एका दिवसात कन्फर्मेशन मिळेल. उर्वरित कागदपत्रे फक्त 3 दिवसात पूर्ण केली जातील.

लोन कोण-कोण घेऊ शकेल ?
या लोनसाठी फेसबुकने दोन अटी ठेवल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे या लोनसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा व्यवसाय त्याच्या सर्व्हिस नेटवर्कसह भारतीय शहरात असावा. दुसरी अट म्हणजे तुम्ही मेटा किंवा फेसबुकशी संबंधित कोणत्याही अ‍ॅपशी किमान गेल्या 6 महिन्यांपासून कनेक्ट असला पाहिजे आणि तुमच्या व्यवसायाची जाहिरात केली पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत फक्त लहान उद्योजकांनाच लोन मिळणार आहे.

अशा प्रकारे अर्ज करा
लोनसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला Facebook Small Business Loans Initiative पेजवर जावे लागेल. तुम्ही Apply Now वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल. यावर तुम्हाला तुमच्या व्यवसायाशी संबंधित आणखी काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. मागितलेली सर्व माहिती भरून ती सादर करावी लागेल. तुम्ही लोनसाठी पात्र असल्याचे समजल्यास, कंपनी तुमच्याशी संपर्क करेल.

Leave a Comment