हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जगभरात फेसबुक (Facebook) वापरणाऱ्या लोकांची संख्या मोठया प्रमाणात आहे. मात्र गेल्या काही वेळा तासापासून फेसबूकची सेवा ठप्प झाली आहे. अनेक लोकांचे फेसबुक आपोआप लॉगऑऊट होत आहे. यासोबत इंस्टाग्राम देखील डाऊन झाले आहे. सुरुवातीला फेसबुक वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले होते. त्यानंतर अचानक फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. तसेच, हे असे का होत आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वेळापासून अनेकांचे फेसबुक (Facebook) अचानक लॉगआऊट होत आहे. तसेच इंस्टाग्राम देखील डाऊन सांगितले जात आहे. त्यामुळे वापरकर्ते पुन्हा नवीन पासवर्ड घेऊन लॉगिन करत आहेत, मात्र त्यांनी टाकलेला पासवर्ड देखील चुकीचा सांगितला जातो. हीच गोष्ट इंस्टाग्रामसोबत देखील होता. परंतु असे काही तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम सोबत होत असल्यास गोंधळून जाण्याची गरज नाही. तसेच पासवर्ड बदलण्याची देखील गरज नाही. सध्या फक्त फेसबुक इंस्टाग्रामची सेवा खंडित करण्यात आली आहे. यावर फेसबुककडून (Facebook) लवकरच अधिकृत उत्तर देण्यात येईल.