हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदललं आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. आता ही कंपनी ‘मेटा’ या नावाने (Meta) ओळखली जाईल.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क जुकरबर्गने गुरुवारी कंपनीच्या कार्यक्रमात याची घोषणा केली. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री ही घोषणा करण्यात आली. येथे त्यांनी मेटावर्ससाठी असलेलं आपलं व्हिजन सांगितलं. झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं आहे
“I am proud to announce that, starting today, our company is now Meta.”
— CEO Mark Zuckerberg announces Facebook’s new name. pic.twitter.com/6YYaEKcufj
— The Recount (@therecount) October 28, 2021
दरम्यान, फेसबुकच्या या घोषणेमुळे ओरिजनल अॅप आणि सर्विस जी सुरू आहेत, ती सुरू राहतील आणि यात काही बदल होणार नाही. या कंपनीची री-ब्रँडिंग आहे आणि कंपनीचे बाकी प्रॉडक्ससारखे व्हॉट्सअॅप आणि इन्स्टांग्रामला कंपनीच्या नव्या लेबलअंतर्गत आणण्याची योजना आहे.