औरंगाबादमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ अपलोड करणाऱ्या फेसबुक युझरवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । बंदी असलेल्या चाईल्ड पॉर्नोग्राफी चे व्हिडिओ शहरातील सिडको सातारा आणि छावणी परिसरातून सोशल मीडियावर वायरल करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्हिडिओ अपलोड करणाऱ्या फेसबुक प्रोफाईल विरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात प्रथमच दिल्लीतील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने पुढाकार घेत ही कारवाई केली आहे.

केंद्र सरकारने अमेरिकन संस्थेशी फेसबुक आणि सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या चाईल्ड पॉर्नोग्राफी बाबत कारवाई करण्याबाबत करार केला होता. यावरून दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो पत्ता आणि शोषित मुलांच्या राष्ट्रीय केंद्राकडून काही लैंगिक शोषण आणि फोटोग्राफर प्राप्त झाले होते.

हे व्हिडिओ एकाने फेसबुक सह इतर सोशल मीडियावर वायरल केले होते. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर दिल्लीच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या किळसवाण्या प्रकाराबाबत १८ डिसेंबर २०१९ रोजी कायदेशीर कारवाई करण्याची सूचना केल्या होत्या.