सर्व सुविधा free देऊनही Facebook करतोय कोट्यवधींची कमाई, कसे ते जाणून घ्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील कंपन्यांचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आपल्या उत्कृष्ट तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 11 टक्के वाढ झाली आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की फेसबुकच्या सर्व सेवा या विनामूल्य आहेत, तर त्यांच्या कमाईचा स्रोत काय आहे? चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात …

आयडिया बनली कंपनी- हॉस्टेलच्या एका खोलीतून सुरू केलेली एक छोटीशी कल्पना ही एक ग्लोबल प्रोजेक्ट बनला आहे, जगभरातील जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्या आज फेसबुकच्या रजिस्टर्ड युझर्समध्ये समाविष्ट आहेत. दररोज सुमारे 180 कोटी लोकांना फेसबुकवर लाईक्स, कमेंट्स बरोबर फोटोही टाकतात. आता जाणून घेऊयात कि कंपनी नफा कसा कमवते…

कंपनी अशा प्रकारे करते कमाई- तज्ञांच्या मते, सरासरी प्रत्येक युझर दिवसातून सुमारे 58 मिनिटे फेसबुकवर खर्च करतो. गेल्या काही वर्षांत कंपनीचे एकूण उत्पन्न तीन पटीने वाढले आहे. 30 जुलै 2020 रोजी कंपनीने जाहीर केलेल्या निकालांनुसार, प्रति युझर कंपनीचे उत्पन्न (ARPU-Average Revenue Per Users) 6.76 डॉलर (सुमारे 507 रुपये) वरुन 7.06 डॉलर (सुमारे 529 रुपये) पर्यंत वाढले आहेत. जर सोप्या शब्दात सांगायचे तर, कंपनी आपल्या प्रत्येक युझर मार्फत 500 रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावत आहे.

फ्री सर्विस – आता प्रश्न असा आहे की जर फेसबुकच्या सर्व सुविधा यूजर्ससाठी फ्री आहेत तर त्यांच्याकडे पैसे कुठून येतात? फेसबुक आपल्या यूजर्सकडून थेट पैसे घेत नाही, परंतु ते यूजर्सचा डेटा बेस एकत्रित करतो आणि व्यवसाय कंपन्यांना विकतो. आपले प्रत्येक क्लिक आपल्याला कुठल्याना कुठल्या कंपनीशी जोडतात.

डेटाच्या बदल्यात पैसा – फेसबुक आपल्या यूजर्सचा डेटा विकून कंपन्यांकडून पैसे कमावते. उदाहरणार्थ, साइट किंवा कंपनीमध्ये रजिस्टर करण्यापूर्वी, बर्‍याच वेळा आपल्याला फेसबुक युझर म्हणून पुढे जायचे आहे की नाही असे विचारले जाते आणि जर आपण होय केले तर ती साइट किंवा कंपनी आपली सर्व माहिती फेसबुक वरून घेते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment