Fact Check : 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? सरकारने दिली महत्वाची माहिती

Fact Check 500 Notes
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fact Check । आजच्या युगात सोशल मीडियावर कधी कधी अशा बातम्या आपल्या कानावर येतात कि पायाखालची वाळूच सरकते. अशीच एक बातमी कॅपिटल टीव्ही नावाच्या एका युट्यूब चॅनेलने दिली होती… पुढच्या वर्षी म्हणजे २०२६ पर्यंत ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार असा दावा या चॅनलने केला होता. त्यातच भर म्हणजे रिजर्व बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांनी त्यांच्या ATM मध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिल्याने खरोखरच आता ५०० रुपयांच्या नोटा बंद पडणार असा समज सर्वसामान्य नागरिकांना झाला. दबक्या आवाजात तशा चर्चाही सुरु झाल्या. मात्र सरकारी एजन्सी पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल बातमी मागणी सत्यता लोकांपर्यंत पोचवत असा कोणताही निर्णय आरबीआयने घेतलेला नाही असं म्हंटल आहे.

काय आहे सत्यता? Fact Check 

पीआयबीने म्हटले आहे की, कॅपिटल टीव्ही नावाच्या एका यूट्यूब चॅनेलने 500 रुपयांच्या नोट बंद केल्याची बातमी दाखवली आहे. यात कोणतेही तथ्य नाही आणि ते पूर्णपणे खोटे आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) ५०० रुपयांच्या नोटांबाबत अजून तरी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या ज्याप्रमाणे ५०० रुपयांच्या नोटा चलनात आहेत तशाच त्या इथून पुढेही कायम राहतील. नागरिकांनो, कधीही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा शेअर करण्यापूर्वी नेहमीच अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करा! असं आवाहनही देशवासियांना केलं आहे. Fact Check 

दरम्यान, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या ३७.३ टक्क्यांनी वाढली असल्याचा धक्कादायक अहवाल आरबीआयने दिला आहे. २०२५ च्या आर्थिक वर्षात ५०० रुपयांच्या १.१८ लाख बनावट नोटा पकडण्यात आल्या, या नोटांची एकूण किंमत तब्बल ५.८८ कोटी रुपये होती. तर त्याच्या आधी म्हणजे २०२४ च्या आर्थिक वर्षात ८५,७११ बनावट नोटा सापडल्या होत्या, ज्याची किंमत ४.२८ कोटी रुपये होती.

दुसरीकडे, 500 रुपयांच्या नोटा बंद करा आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन द्या असं आवाहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारला केलं आहे. मोठ्या नोटा चलनात आणल्याने काळ्या पैशाला चालना मिळते, मात्र सरकारने ५०० रुपयांच्या नोटा बंद केल्यास भ्रष्टाचार संपेल असा विश्वास चंद्राबाबू नायडू यांना वाटतोय. डिजिटल चलनातून पेमेंट केल्यास भ्रष्टाचार शोधणे सोपे होऊ शकते. सरकारच्या या पावलामुळे केवळ भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही तर चलनी नोटा छपाईचा खर्चही कमी होईल अशी भूमिका चंद्राबाबू नायडू यांनी मांडली होती. मात्र आता पीआयबी फॅक्ट चेक (Fact Check ) मुळे ५०० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा आरबीआयचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट झालं आहे.