हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : गेल्या काही काळापासून घसरणीच्या गर्तेत अडकलेल्या भारतीय शेअर बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजी दिसून आली आहे. गेल्या आठवड्यात तर सेन्सेक्सने 60 हजारांची पातळी ओलांडली.जे बाजारासाठी एक चांगले लक्षण असल्याचे मानले जात आहे. आता येत्या आठवड्यात शेअर बाजारावर कोणत्या घटकांचा परिणाम दिसून येईल हे समजून घेउयात. तर विदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, जागतिक कल आणि रुपयाची वाटचाल याद्वारे येत्या आठवडय़ात शेअर बाजाराची दिशा ठरवली जाईल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
स्वास्तिका इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे रिसर्च प्रमुख असलेले संतोष मीना यांनी सांगितले कि, “येत्या आठवड्यात ऑगस्टमधील फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) चे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होतील. तसेच ऑगस्ट मध्ये मोठा नफा मिळविल्यानंतर बाजारातील बुल्स देखील विश्रांतीच्या शोधात असतील. त्यामुळे येत्या बाजारात आठवड्यात फारसे काही घडणार नाही. मात्र त्याबरोबरच जागतिक संकेत, ऑगस्ट महिन्याच्या F&O चे कॉन्ट्रॅक्ट आणि FII द्वारे बाजाराची दिशा ठरवली जाईल”.
FPI चा रोख महत्वाचा
या महिन्यात जवळपास सर्वच कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. ज्यामुळे आता बाजाराचे लक्ष कच्च्या तेलाच्या ट्रेंड व्यतिरिक्त चीन-अमेरिका यांच्यातील भू-राजकीय तणाव आणि रशिया-युक्रेन संघर्षावर असेल. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड उपाध्यक्ष (रिसर्च) असलेले अजित मिश्रा यांनी सांगितले की, “या आठवड्यात ट्रेडर्स फ्युचर्स डील सेटलमेंटमध्ये व्यस्त असतील. याशिवाय अमेरिकेकडून येणारे जागतिक संकेत आणि परकीय गुंतवणुक यावरही बाजार लक्ष ठेऊन असेल.” Stock Market
गेल्या आठवड्यातील बाजारावर एक कटाक्ष
गेल्या आठवड्याबाबत बोलायचे झाल्यास यावेळी सेन्सेक्स 183.37 अंकांनी किंवा 0.30 टक्क्यांनी वाढला तर निफ्टी 60.30 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी वधारला. यावेळी निफ्टी 50 देखील 60.50 अंकांच्या (0.34 टक्के) वाढीसह 17,758.5 वर बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने 60,000 चा टप्पा ओलांडला तर निफ्टी देखील 18,000 च्या जवळ पोहोचला. गेल्या आठवड्यामध्ये बीएसई मिड-कॅपमध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली. Stock Market
परदेशी गुंतवणूकदार
गेल्या महिन्यात निव्वळ खरेदी केल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्येही भारतीय शेअर बाजारांमध्ये प्रचंड उत्साह दाखवला. ऑगस्टमध्ये आतापर्यंत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून (FPIs) सुमारे 44,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील चलनवाढ आणि डॉलर इंडेक्समधील घसरणीमुळे भारतीय बाजारावरील त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. Stock Market
डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, FPI कडून जुलै महिन्यात सुमारे 5,000 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक करण्यात आली होती. इथे हे लक्षात घ्या कि, FPI कडून सलग नऊ महिने मोठ्या प्रमाणावर विक्री केली गेली ज्यानंतर जुलैमध्ये त्यांनी पहिल्यांदाच निव्वळ खरेदी केली. यापूर्वी, ऑक्टोबर 2021 ते जून 2022 दरम्यान भारतीय इक्विटी मार्केटमध्ये त्यांनी 2.46 लाख कोटी रुपयांची प्रचंड विक्री केली होती. Stock Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nse.com
हे पण वाचा :
Aadhar Card मध्ये कोणती माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या !!!
Multibagger Stock : गेल्या वर्षांत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 63,000% रिटर्न !!!
Vivo चा बजेट स्मार्टफोन लॉन्च; किंमत 11 हजारांहून कमी
PM Kisan Yojana च्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! या तारखेला मिळणार 12व्या हप्त्याचे पैसे
HDFC Bank ने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा