मुख्यमंत्री फडणवीस, लोणीकरांच्या भाषणातून स्वबळाने लढण्याचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या तिन्ही सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भाषणांमधून स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक भाजपा स्वतंत्र लढते की काय अशा चर्चां सुरु झालीय.

परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या चार जागा आहेत पैकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ वगळता तीन जागा युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेकडे आहेत. त्यामध्ये पाथरी जिंतूर परभणी यांचा समावेश आहे. तर परभणी लोकसभेमध्ये जालना जिल्ह्यातील घनसावंगी व परतूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. काल महाजनादेश यात्रेमध्ये सेलू ,पाथरी, परभणी येथे झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक सभेच्या शेवटी तुम्ही मला आशीर्वाद देणार का ?तुम्ही बोर्डीकर यांना आशीर्वाद देणार का ?तुम्ही मोहन फडांना आशीर्वाद देणार का ? तुम्ही आनंद भरोसेना आशीर्वाद देणार का ? तुम्ही रबदडे मामा यांना आशीर्वाद देणार का ?असे उपस्थित जनतेला प्रश्न विचारले. त्यानंतर तुम्ही भाजपाला महाजनादेश देणार का ? असाही प्रश्न विचारला यावर उपस्थितांमधून मोठ्याने होकार देण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या ज्या तीन इच्छुक उमेदवारांचा उल्लेख केला आहे ,ते तिघेही निवडणुक लढण्यास इच्छुक असणारे मतदारसंघ शिवसेनेसाठी युतीच्या वाटाघाटीत सुटलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा या तिन्ही जागा वर आपला हक्क सांगू शकते किंवा भाजपा स्वबळावर लढू शकते हेच यातून संकेत मिळत आहेत.

या सर्वांमधून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर बोलताना आगामी निवडणुकांमध्ये भाजपला 288 पैकी 288 जागा यश मिळाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही असे म्हणाले आहेत. परभणी आणि जालना आता भाजपाचे बालेकिल्ले झाले असून परभणी जिल्ह्यातील चारही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आणू असे ठामपणे म्हणले आहेत. त्यामुळे लोणीकर यांच्या भाषणातून अप्रत्यक्षरित्या स्वबळाची ‘रि’ ओढण्यात आल्याचे दिसून आले. तर भाजपाच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी आमची तयारी पूर्ण असून तुम्ही फक्त आदेश द्या ! असे वक्तव्य केले आहे.
काल महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने झालेल्या भाषणातून आता जिल्ह्यात राजकीय चर्चां मध्ये तर्क-वितर्क लावले जात असून, त्यामध्ये शिवसेनेच्या गोठामध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र निर्माण झालंय.

Leave a Comment