हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून अध्यक्षनिवडी च्या प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. आवाजी मतदानाने हि निवड होणार असून या निवडणूकीच्या संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात मांडण्यात आला. यानंतर विरोधकांनाही भूमिका न पटल्याने सभागृहातून सभात्याग केला. यावेळी सुधीर मुनगंटीवारांच्या कृतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फिरकी घेतली
मुनगंटीवार हे सभागृहातच बसून राहिले आहेत त्यामुळे विरोधकांचं सभात्याग हा रेकॉर्ड ला धरू नये आणि याचा उल्लेख सभात्याग केला असा होऊ नये असं जयंत पाटील यांनी म्हंटल, यानंतर मुनगंटीवारांनी देखील प्रत्युत्तर देत चहापानाचा मुख्यमंत्री उपस्थित नव्हते मग त्यांचाही बहिष्कार होता असे समजायचं का म्हणत पलटवार केला
विधिमंडळात नेमकं काय घडलं
अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने घेण्याचे नियम का बदलले? नियम रचनेत बदल करण्यात आला. लोकशाहीत 60 वर्षांत असं कधी झाली. मग या सरकारवर नियम रचनेत बदल करण्याची वेळ का आली? अध्यक्षांची निवडणूक ही आवाजी मतदानाने का होणार?” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यांना नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिल. क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असा निर्णय घेतला होता. किमान त्यांच्या निर्णयाचा तर आदर करा. मग सर्वांनी आता हरकत घेऊ नका आणि एकमताने मंजूर करा, असं मलिक म्हणाले
यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, अटलबिहारी वाजपेयी यांनी अध्यक्ष निवडणुकीला व्हीप जारी करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे सरकार 10 दिवसांचा कालावधी एक दिवसावर का आणत आहे. सरकार भीतीपोटी हे सर्व करत आहे, असं फडणवीस म्हणाले. विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रिया संदर्भात आम्हांला हा निर्णय मान्य नाही त्यामुळे आम्ही सभात्याग करत आहोत. यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला. मात्र मुनगंटीवार मात्र तिथेच चहा पिट असल्याचे दिसताच जयंत पाटलांनी विरोधकांचं सभात्याग हा रेकॉर्ड ला धरू नये असं म्हंटल