पैसे घेऊन बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लग्न होत नसलेल्या वयस्कर व्यक्तींकडून पैसे उकळून त्यांचे बनावट लग्न लावून देणाऱ्या टोळीचा पुणे स्थानिक गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे. याबाबत पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षांची महिला (रा. केसनंद फाटा वाघोली) या टोळीतील मुख्य आरेापी असून विवाह न जमलेल्या वयस्कर तरूणांकडून रोख २ ते ३ लाख रूपये घेऊन त्याचेशी तिचे सानिध्यात असणारे इतर स्त्रीयाशी संपर्क ठेवुन विवाहीत स्त्रीयांची लग्ने लाऊन देत होती. विवाहीत झालेली स्त्री ही संबंधित पुरूषाकडे ७/८ दिवस राहिलेनंतर ठरलेल्या कटाप्रमाणे विवाहीत स्त्रीला ते परत माहेरी जाण्यासाठी घेऊन जात होते व परंतु नांदण्यास पाठवित नव्हते. किंवा लग्न झालेली विवाहीत स्त्री ही घरात कोणी नसल्याचे पाहुन पैसे व दागदागिने घेऊन पळून जात होते. परंतु इज्जतीपोटी अदयापपर्यंत कोणीही त्याचे विरूध्द तक्रार दिलेली नव्हती.

यातील मुख्य आरेापी महिलेला गणेश अर्जुन सावळे (वय ३२, रा. दिवड’ ता. मावळ जि.पुणे) यांचे लग्न जमत नसल्याची माहिती मिळाली. त्या माहितीचे आधारे ती दिवड येथे त्याचे घरी जावुन त्याचे बाबत माहिती काढुन त्याचेकडे एक मुलगी लग्नाची असल्याचे सांगून त्याची ओळख विदया सतिश खंडाळे (वय २७ रा. पद्मावती कात्रज धनकवडी) यांच्यासोबत करून हीच मुलगी व तिचे नांव – सोनाली मच्छिद्र जाधव रा.मालगांव ता.मालेगांव जि.धुळे असे असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात विदया खंडाळे ( सोनाली जाधव )हीचे लग्न झालेले असून २ मुले आहेत.

त्यानंतर दिनांक २१ जानेवारी २०२१ रोजी ज्योती पाटील हीने तसेच सदर गुन्हयातील इतर स्त्रीया आरेापी (1)महानंदा तानाजी कासले वय वर्षे ३९ रा. काळे पडयाळ हडपसर पुणे (2)रूपाली सुभाष बनपटटे वय वर्षे ३७ रा. वडारगल्ली बाबा हाॅस्पीटल मागे (3) कलावती सुभाष बनपटटे वय वर्षे २५ रा.वडारगल्ली बाबा हाॅस्पीटल मागे (4) सारीका संजय गिरी वय वर्षे ३३ रा. वडारवाडी बाबा हाॅस्पीटल मागे (5) स्वाती धर्मा साबळे वय वर्षे २४ रा. भेकराई नगर हडपसर (6) मोना नितीन साळुके वय वर्षे २८ रा.मांजरी महाराष्ट्र बॅके जवळ मांजरी (7) पायल गणेश साबळे वय वर्षे २८ रा.गडद ता.खेड जि.पुणे यांनी विदया सतिष खंडाळे हीस सोनाली मच्छिद्र जाधव म्हणुन लग्नास उभी असुन तिचे आळंदी येथे गणेश अर्जुन सावळे वय वर्षे ३२ रा.दिवड ता.मावळ जि.पुणे याचेषी लग्न लावुन दिले व त्या लग्नापोटी गणेश अर्जुन सावळे वय वर्षे ३२ रा.दिवड ता.मावळ जि.पुणे याचे कडुन २,४०,००० रू. (दोन लाख चाळीस हजार रू.) घेतले. यातील मुलगी विदया सतिष खंडाळे ही सोनाली मच्छिद्र जाधव म्हणुन गणेश अर्जुन सावळे वय वर्षे ३२ रा.दिवड ता.मावळ जि.पुणे याचे कडे नांदण्यास आलेवर ती फोनवरून वेळोवेळी तिचा प्रियकर सोन्या रसाळ याचेषी दिवसातुन २ ते ३ तास चर्चा करीत असल्याने घरातील लोकांना संशय आला तसेच तीचे लग्न झाले बाबत सोन्या रसाळ याचेकडुन समजल्याने आपली फसवणुक झाली असल्याचे समजल्याने गणेश सावळे व त्याचे घरातील लोकांनी तिचे हालचालीवर लक्ष ठेवले.

त्यानंतर दिनांक ८/२/२०२१ रोजी नमुद विदया सतिष खंडाळे हीस तिचे लग्न लावणारे लोक नेण्यासाठी येणार असल्याचे समजल्याने व जाताना विदया ही घरातील सोने व पैसे चोरून नेणार असल्याचे तिचे फोनवरून झालेल्या चर्चे वरून समजल्याने गणेष सावळे व त्याचे घरातील लोक नमुद स्त्रीयाची वाट पहात होते. ते सायंकाळी ४.०० वा.सु. घरी आले व त्या सर्व स्त्रियांच्या हालचाली संषयास्पद वाटल्याने सदर बाब ही स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांना कळविली.

त्यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पुणे ग्रामीण यांचे आदेशानुसार खालील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी हालचाली करून त्या सर्व स्त्रिया तसेच एक तेवरा व रिक्षासह २ पुरूष असे ताब्यात घेवुन चैकषी करता त्या स्त्रियाकडे मोबाईल फोन तसेच विदया खंडाळे हीचे कडे तिने गणेष सावळे याचे घरातुन चोरलेले रोख २०,००० रू. हस्तगत करून पुढील कारवाई कामी वडगांव मावळ पेालीस स्टेशनचे ताब्यात देणेत आलेले आहे. सदर घडले प्रकाराबाबत गणेष अर्जुन सावळे वय वर्षे ३२ रा.दिवड ता.मावळ जि.पुणे यांनी वडगाव मावळ पेालीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे.

अशाप्रकारे ज्योती रविंद्र पाटील व तिचे बरोबर असणारे स्त्रियांनी अनेक तरूणाची फसवणुक केलेली असल्याची शक्यता असुन ज्यांची फसवणुक झालेली आहे अशा तरूणांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण किंवा वडगांव मावळ पेालीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहा. पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय जगताप, सहा उप निरीक्षक एस.के पठाण, राजेंद्र थोरात, आर.बी.पुणेकर, एम.जी.अयाचित, एस.जे.चंद्रशेखर, पी.एच.घाडगे, एस.पी.नाईकनवरे, एस.पी. अहिवळे, अक्षय नवले, एल.पी.जगताप, पी.जी.कांबळे, सोनल धुमाळ यांनी केलेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like