‘ती’ पोस्ट वायरल होताच आमदाराने पोलिस ठाण्यात घेतली धाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये संतप्त आणि भीतीचे वातावरण आहे. त्यातच समाजमाध्यमांकडून राजकारणी लोकांना टार्गेट करण्यात येत आहे. अशीच एक घटना कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्याबाबतीत घडली आहे. काही दिवसांपूर्वी कामठीचे आमदार हरवल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर त्यांच्या ‘निधन’ आणि ‘श्रद्धांजली’चीसुद्धा पोस्ट वायरल झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली.

हा सगळा प्रकार आमदार टेकचंद सावरकर यांच्या लक्षात येता त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तसेच आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हरवल्याची पोस्टसुद्धा वायरल झाली होती. या सगळ्याची चर्चा सुरु असताना एका व्यक्तीने त्यांचे ‘निधन’ झाल्यासह त्यांना ‘श्रद्धांजली’ वाहिल्याची पोस्ट व्हायरल केली.

याबद्दल आमदार टेकचंद सावरकर यांना समजताच त्यांनी वाठोडा पोलिस ठाण्यामध्ये त्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पोस्ट टाकणारा प्रीतम व आणखी दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार टेकचंद सावरकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप विरोधकांचा हा डाव असल्याचा दावा आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

Leave a Comment