Fake smartphone : स्मार्टफोन युजर्स सावधान..! तुम्ही वापरत असलेला स्मार्टफोन बनावट तर नाही ना? या ट्रिकच्या मदतीने आत्ताच करा चेक…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Fake smartphone : बाजारात सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. या नवीन स्मार्टफोनमध्ये सगळ्या कंपन्या चांगल्या दर्जाचे कॅमरे त्याचबरोबर जबरदस्त फीचर्सही देत आहे. काहीं स्मार्टफोनची किंमत खूप जास्त असते तर काही स्मार्टफोन खूप स्वस्त असतात.

जर तुम्हीही तुमचा स्मार्टफोन डिस्काउंट ऑफर किंवा कमी किमतीच्या नावाखाली घेतला असेल तर तो बनावट असू शकतो. पण घाबरायची काही गरज नाही यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे आपण काही युक्ती वापरून, स्मार्टफोन वापरकर्त्याला त्याच्या डिव्हाइसची खरी किंवा बनावट माहिती काही सेकंदात मिळू शकते. तर ते कसे? जाणून घेऊया सविस्तर…

स्मार्टफोन खरा आहे की खोटा हे कसे ओळखायचे?

स्मार्टफोनच्या खऱ्या आणि बनावटीची माहिती त्याच्या IMEI नंबरवरून घेता येते. फोनच्या डायल पॅडवर कोड टाकून IMEI नंबर तपासता येतो.

– यासाठी सर्वप्रथम स्मार्टफोनचे डायल पॅड उघडावे लागेल.
– आता डायल पॅडवर *#06# हा कोड डायल करावा लागेल.
– तुम्ही कोड डायल करताच स्क्रीनवर IMEI नंबर दिसेल.
– आता 14422 वर मेसेज पाठवावा लागेल.
– मेसेज पाठवण्यासाठी टेक्स्टमध्ये KYM लिहून स्पेस द्यावी लागेल आणि IMEI नंबर टाकावा लागेल.
– हा मेसेज पाठवण्यासोबतच तुम्हाला फोनवर लगेच मेसेजही मिळू शकणार आहे.
– या संदेशासोबत IMEI Is Valid स्थिती दिसत असल्यास, तुमचा फोन खरा आहे.

बनावट फोन म्हणजे काय?

बनावट फोन म्हणजे, तुम्ही असे डिव्हाइस वापरत आहात जे वास्तविक मोबाइल फोन उत्पादकाने बनवलेले नाही. हे इतर मोठ्या ब्रँडचे कॉपी उत्पादन असू शकते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, ओरिजिनल फोनच्या डिझाइनची कॉपी करून अशा प्रकारचे डिव्हाइस विकले जाते.