‘द फॅमिली मॅन २’ तामिळ विरोधी…?; ट्रेलर पाहून समंथाला बहिष्कृत करीत प्रेक्षकांच्या संतापाचा झाला उद्रेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता मनोज बाजपेयीचा ‘द फॅमिली मॅन’ या वेब सिरीजचा पहिला सीजन लोकांना प्रचंड आवडला होता. या यशानंतर आता या वेब सिरीजचा दुसरा भाग अर्थात द फॅमिली मन २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच त्याचा दमदार आणि रंजक असा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे या सिरीजमध्ये मनोज सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी एका मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

https://www.instagram.com/tv/CPCjI_-lfiV/?utm_source=ig_web_copy_link

या पण ट्रेलरसोबतच या वेबसीरिजने एक वेगळाच वाद ओढवून घेतला. सोशल मीडियावर #FamilyMan2_against_Tamils असा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होऊ लागला. सोबतच प्रेक्षक समंथा अक्किनेनीवर बहिष्कार टाकून तामिळ इंडस्ट्रीमधून हद्दपार करण्याची मागणी करीत आहेत.

‘द फॅमिली मन २’ या वेब सिरीजचे कथानक दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवर रचलेले आहे. यामुळे दक्षिण भारतातील लोक ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर पाहून अतिशय संतापले आहेत. या वेब सीरिजमध्ये श्रीलंकेत आपल्या हिताची लढाई लढणा-या तामिळ बंडखोरांचा संबंध ‘आय एस आय एस’ या अतिरेकी संघटनेशी जोडला आहे, असा दावा अनेक लोकांनी सोशल मीडियावर केला आहे.

परिणामी सोशल मीडियावर याबद्दलचे पडसाद उमटत आहेत. अनेक लोक विविध पद्धतीने आपला संताप व्यक्त करीत आहेत. ‘द फॅमिली मॅन २’ तामिळविरोधी आहे, तामळींना अतिरेक्यांसारखे दाखविले आहे, असे आरोप अनेकजण करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर हे युजर्स साऊथची सुपरस्टार समंथा अक्कीनेनीला तामिळ फिल्म इंडस्ट्रीतून हद्दपार करा अशीही मागणी करीत आहेत.

https://twitter.com/Navan63441302/status/1394941567689904130

या वेब्सिरीजच्या माध्यमातून सामंथाने बॉलिवूड चित्रपटसृष्टी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. समंथाने ‘द फॅमिली मॅन २’मध्ये राजी नामक व्यक्तिरेखा साकारली आहे. मनोज वाजपेयी या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहे. पण समंथाही त्याच्यासोबत अतिशय महत्वाच्या भूमिकेत दिसतेय. मात्र तिच्या चाहत्यांना कदाचित तिची हि प्रगती पचण्याजोगी नाही. त्यामुळे अनेकजण ट्विटरच्या माध्यमातून तिच्याविषयी राग व्यक्त करीत आहेत.

‘यानंतर तुझा एकही सिनेमा तामिळनाडूत प्रदर्शित होऊ देणार नाही’, असे एका युजरने ट्विट करताना लिहिले आहे. तर अन्य एका युजरने लिहिले कि, समंथा तू तुझ्या करिअरमधील खूप मोठी चूक केलीस, याचे परिणाम तुला भोगावे लागतील. आता या सगळ्यामुळे ‘द फॅमिली मन २’ चे भविष्य आणि समंथाचे उज्ज्वल करिअर कोणत्या दिशेकडे वाटचाल करणार..? हे प्रेक्षकांच्या हाती आहे.

Leave a Comment