सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओला भीषण आग

खोपोली : हॅलो महाराष्ट्र – प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये जोधा अकबर सेट जवळील फायबर मुर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे आज दुपारी १२च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये शनिवार वाड्याचा सेटसुद्धा जळाला आहे. या आगीमुळे खूप आर्थिक नुकसान झाले आहे.

आग कशामुळे लागली याचे करून अजून समजू शकले नाही. ‘जोधा अकबर’ सेटजवळील फायबर मूर्ती गोडाऊन व फायबर सेट येथे ही आग लागली असून ती विझवण्याचे काम सध्या सुरु आहे. हि आग मोठ्या प्रमाणात आहे. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ या परिसरात पहायला मिळत आहेत. घटनास्थळी खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार, पोलीस निरीक्षक विभूते व संबंधित यंत्रणा दाखल झाली आहे. तसेच फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या बोलावण्यात आल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पण या आगीमध्ये स्टुडिओचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पण हि आग कशामुळे लागली याचे कारण अजून समजू शकले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एनडी स्टुडिओ बंद होता त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

You might also like