प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पर्ल पुरीला POCSO अंतर्गत अटक; अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता करण मेहरा याला कौटुंबिक वादातून पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीवरही एका मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी कारवाई झाली आणि आता त्याच्यानंतर नागिन, ब्रह्मराक्षक या सारख्या अत्यंत लोकप्रिय मालिकांतून महत्त्वाची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता पर्ल पुरी यालाही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणात POCSO अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

एकता कपूरच्या नागिन या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या पर्ल व्ही पुरीला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पर्ल विरोधात एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. ४ जून २०२१ रोजी या मुलीच्या कुटुंबीयांनी पर्ल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही तासांतच पोलिसांकडून कारवाई होत त्याला अटक करण्यात आली आहे. ही मुलगी अल्पवयीन अर्थात वयोवर्ष १८हून कमी असल्यामुळे पर्लच्या विरोधात POCSO (Protection of Children from Sexual Offences Act, 2012) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

https://www.instagram.com/p/CNuYBw-suD4/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेता पर्ल व्ही पुरी याने छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याने सरलेल्या प्रत्येक भूमिकेमुळे प्रेक्षकांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे. बेपनाह प्यार, ब्रह्मराक्षस २, नागिन ३, ‘नागार्जुन एक योद्धा’ या सुपरहिट मालिकांमध्ये पर्ल मुख्य भूमिकेत दिसला आहे. यातील नागीण मालिकेमुळे त्याला विशेष अशी ओळख मिळाली व तो प्रकाशझोतात आला. गेल्या काही काळात तो याच मालिकेमुळे प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर पर्लचे मोठ्या संख्येतील फॅन फॉलोव्हिंग आहे.

Leave a Comment