फरहान, तू सुद्धा कायदा मोडतोयस; ‘CAA’ च्या विरोधावर आयपीएस अधिकाऱ्याने दिली कायद्याची समज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 टीम, HELLO महाराष्ट्र। पोलीस हे कायद्याचं रक्षण करण्यासाठीच असतात. आणि हा कायदा सगळ्यांना समान असतो हे दाखवून द्यायची वेळ आलीच तर ते मागे हटत नाहीत. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन अनेक सेलिब्रिटी लोक आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरनेही ट्विट करत आपली भूमिका मांडली होती. आता फक्त सोशल मीडियावरुन विरोध करण्याची वेळ संपली आहे,” आता आंदोलन करणं गरजेचं आहे असं म्हणत १९ डिसेंम्बरला मुंबईतील क्रांती मैदानात एकत्र येण्याचा निर्धारही फरहानने बोलून दाखवला होता.

फरहानच्या या ट्विटवर आयपीएस अधिकारी संदीप मित्तल यांनी उत्तर दिलं आहे. फरहानने कायदा मोडला असल्याचं त्यांनी व्हिडियोच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. तसेच त्यांनी मुंबई पोलिस आणि भारतीय तपास यंत्रणेला टॅग करुन फरहानवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

फरहानकडून नकळत ही चूक झाली असं म्हणता येणार नाही असा उल्लेखही मित्तल यांनी पुढे केला आहे. आपण करत असलेलं कृत्य देशविरोधी असणार नाही ना? याची तपासणी करणं गरजेचं असल्याचंही मित्तल यावेळी म्हणाले.

Leave a Comment