धक्कादायक ! महिला हेड कॉन्स्टेबलसह पतीची राहत्या घरी आत्महत्या

चंदिगढ : वृत्तसंस्था – हरियाणातील फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महिला हेड कॉन्स्टेबल आणि तिच्या पतीचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सेक्टर-31 येथील पोलीस लाईनमधील घरी हे दाम्पत्य मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरु केला आहे. हि घटना घडली तेव्हा या दांपत्याचा 11 वर्षांचा मुलगा घरी नव्हता. तो परीक्षेसाठी शाळेत गेला होता, मात्र घरी येऊन पाहिल्यानंतर त्याला आई-वडील मृतावस्थेत दिसल्याने त्याला मोठा धक्का बसला.

काय आहे प्रकरण?
हेड कॉन्स्टेबल सरोज गेल्या काही दिवसांपासून फरिदाबाद शहरातील सेक्टर-31 येथील पोलिस लाईन्समध्ये आपल्या पती आणि मुलासह राहत होत्या. त्या एनआयटी पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. पोलीस लाईनमध्ये राहणारी महिला हेड कॉन्स्टेबल सरोज यांची हत्या झाली आहे. तर त्यांच्या पतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती पोलीस अधिकारी बलवंत सिंग यांनी दिली आहे.

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या मृतदेहांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हत्येमागची कारणे समोर येतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. महिला हेड कॉन्स्टेबलच्या नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सरोज यांना 11 वर्षांचा मुलगा आहे. सरोज यांचा खून झाला त्या दिवशी तो परीक्षा देण्यासाठी गेला होता. मात्र घरी परत आल्यावर त्याने आपल्या आईवडिलांना मृत अवस्थेत पहिले. यामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.