वेल्हे : हॅलो महाराष्ट्र – वेल्हे तालुक्यातील सोंडे माथना या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये किसन निवृ्ती किन्हाळे यांचा खून झाला असून या प्रकरणी त्यांचा भाऊ विनायक रामदास किन्हाळे याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोंडे माथना येथील शेतकरी किसन निवृ्ती किन्हाळे हे गुंजवणी नदीच्या तिरावरुरन घरी परतत असताना विनायक किन्हाळे यांनी त्यांच्यावर अचानक लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये किसन निवृ्ती किन्हाळे यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. त्यांनंतर त्यांना जखमी अवस्थेत भोर तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यागोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी वेल्हे पोलीसांनी विनायक रामदास किन्हाळे यांस अटक केली आहे.
किसन निवृ्ती किन्हाळे हे तंटामुक्त गाव समिती सोंडेमाथनाचे अध्यक्ष होते,तर तोरणासागर विद्यालय निवीचे प्राचार्य मोहन किन्हाळे यांचे ते भाऊ आहेत. मागच्या काही दिवसांपासून किन्हाळे भाऊकीचा आपआपसात वाद होता. सोंडे माथना परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले असुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुदाम बांदल,औंदुबर आडवाल,विशाल मोरे,अभय बर्गे अजय साळुंखे,यांचे पथक गावात गस्त घालत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.