सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातल्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपुरातील एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या (Sucide) करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका तरूण शेतकऱ्यानेसुद्धा कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या (Sucide) केली होती.

हि घटना ताजी असताना पंढरपूर जवळच्या वाखरी येथील परमेश्वर ‌पोरे या शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.परमेश्वर ‌पोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परमेश्वर ‌पोरे हे विषारी औषध घेऊन आत्महत्या (Sucide) करत असल्याचा लाईव्ह व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सावकाराने परस्पर शेत विकल्याच्या कारणातुन परमेश्वर पोरे या शेतकऱ्याने विषारी औषध घेत आत्महत्या (Sucide) करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी सावकारावर गंभीर आरोप केले आहेत. विषारी औषध प्राशन घेत आत्महत्या करत असतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :

25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा, कामाला लागा;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

काँग्रेसचा मोठा निर्णय : पक्षातील सदस्यातील एका कुटुंबाला एकच तिकीट देणार

अण्णा हजारे पुन्हा आक्रमक : महाविकास आघाडी सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुमची वाट लागेल…; नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

बाप शेर तो बेटा सव्वाशेर : गृहराज्यमंत्री देसाईंचे पुत्र यशराज देसाईंनी नवरदेवाला लग्नात दिलं थेट नोकरीचं पत्र