शेतात पाणी देताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर | औसा तालुक्यातील भादा या गावात शेतकऱ्याच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. रात्री वीज आल्यानंतर पिकाला पाणी देण्याच्या निमित्ताने तो शेतात गेला होता. रात्री पिकाला पाणी देण्यासाठी विद्युतपंप चालू करताना त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. हि घटना बुधवारी घडली.

उद्धव आत्माराम जाधव (वय 41) असे या मयत शेतकऱ्याचे नाव असून महावितरणाच्या वेळानुसार भादा फिटरवर रात्रीची वीज होती. त्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी तो मंगळवारी 29 रोजी शेतात मुक्कामी राहण्यासाठी गेला होता. त्याचबरोबर रात्री साडे बाराच्या सुमारास विद्युतपुरवठा सुरु झाल्यावर विद्युतपंप चालू करण्याच्या निमित्ताने त्यांनी बोर्डावरील बटण दाबले असता त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला.

ही घटना सकाळी सर्व गावाकऱ्यांना आणि मयताच्या कुटुंबाला समजली. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. हा मयत मुलगा अतिशय गुणी आणि कष्टकरी असल्याचे समजत आहे. सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक भाऊ, आणि भावजय असा परिवार आहे.

Leave a Comment