मद्यधुंद पोलिसांकडून शेतकरी कुटुंबाला मारहाण ; वडाचे म्हसवे येथील प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

एका शेतकरी कुटुंबियांना मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केला असल्याचा प्रकार जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील रविवारी घडला आहे. या प्रकरणी संबंधित संबंधित पोलिसांच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मारहाण झालेल्या शेतकरी योगेश बाबूराव सामंत यांनी दिली आहे.

या घडलेल्या प्रकाराबाबत योगेश सामंत यांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी मी स्ट्रॉबेरीची विक्री करत असताना मेढा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी विकास शिंदे आणि ड्रायव्हर कांबळे हे दोघेजण आले. त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी अचानकपणे मला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलीला आणि पत्नी शीतल योगेश सावंत यांनाही ढकलून दिले. याबाबत मी जाब विचारायला गेलो असता त्यांनी मला पोलीस गाडीत टाकून कुडाळ पोलीस ठाण्याबाहेर सोडून निघून गेले.

पोलिसांकडून मद्यधुंद अवस्थेत मारहाण करण्यात आली असल्याने याबाबत कुडाळ पोलिस ठाणे आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे संबंधित दबंगगिरी करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात निवेदनाद्वारे तक्रार करणार असल्याचे योगेश सामंत यांनी सांगितले.

Leave a Comment