अवघ्या काही मिनिटांत शेतकर्‍याच्या खात्यावरचे ९१ हजार गायब, नक्की काय झालं वाचा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अॅप्लीकेशन डाउनलोड करनं पडलं महागात

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

बातमी आहे नाशिकमधील सायबर क्राईमची. एका शेतकर्‍याला एक अॅप्लीकेशन डाउनलोड करनं चांगलंच महागात पडलंय. अवघ्या काही मिनिटात शेतकर्‍याच्या बँक खात्यातून 91 हजार रुपये गायब झालेत. नक्की काय घडलेय या शेतकर्‍याच्या बाबतीत पाहुयात.

नाशिकच्या सातपुर भागातील शेतकरी रवी भंदुरे आपल्या मोबाइलवर रीचार्ज करायचा म्हणून गुगलपेचा आधार घेत होते. त्यावरून दोन वेळा रीचार्ज केला. मात्र दोन्हीही वेळेस केलेला रीचार्ज यशस्वी झाला नाही. म्हणून गुगलवर जात गुगल पे चा नंबर शोधला आणि त्यावर कॉल केला. समोरील व्यक्तीने आपला रीचार्ज पूर्ण करण्यासाठी एनीडेस्क नावाचे अप्लीकेशन डाउनलोड करा असे सांगितले. हे अप्लीकेशन डाउनलोड करताच समोरच्या व्यक्तीने सांगितलेली सर्व माहिती भरली आणि काही मिनिटांच्या अंतरावर बँक खात्यातील रक्कम हळूहळू कमी होऊ लागली. आपली फसवणूक तर होत नाही ना अशी शंका येताच मोबाइल स्विचऑफ केला आणि झाले तेच झाले. रवी भंदुरे यांच्या खात्यातून तब्बल 91 हजार रुपये गायब झाले. नुकताच आपला द्राक्ष बाग विकून त्यांच्या पदरी दीड लाख रुपये आले होते आणि त्यातील 91 हजार रुपये गेल्याने भंदुरे यांना मोठा मनस्ताप झालाय.

यानंतर लागलीच भंदुरे यांनी खाते बंद करत पोलिसांत धाव घेतली.. आपली फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगत तक्रार दाखल केली…गुगलवर चुकीची माहिती असल्याने भंदुरे यांना गंडा घातल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलय. त्यामुळे सायबर पोलिसांनी ऑनलाइन व्यवहार घेताना खातरजमा करूनच माहिती द्या अथवा व्यवहार करण्याचे आवाहन केलय.

दरम्यान वाचकांनो सायबर गुन्हे नियत्रणात यावे यासाठी वेळोवेळी पोलिसांकडून आवाहन केलं जात. गुगल वरील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही हे माहिती असतांनाही अश्या प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आपली फसवणूक होऊ नये यासाठी ऑनलाइन व्यवहार करतांना काळजी घ्या.

Leave a Comment