Wednesday, June 7, 2023

शेतकर्‍याने पिकवला २५ किलो गांजा; १ लाखाची झाडे पोलिसांकडून जप्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे |

तासगाव तालुक्यातील ढवळी येथे उसाच्या शेतात पिकलेली २५ किलो गांजाची झाडे तासगाव पोलिसांनी जप्त केली आहेत. या गांजाच्या शेती प्रकरणी ढवळी येथील दिलीप आनंदा बोबडे यास ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत तासगाव पोलिसात मिळालेली अधिक माहिती अशी – ढवळी येथे दिलीप बोबडे यांची उसाची शेती आहे. याच शेतीत त्याने दहा ते बारा गांजाची झाडे लावलेली होती. ही झाडे सहा ते सात फूट उंचीची होती. याबाबत तासगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांना माहिती मिळाली होती. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ढवळी येथे छापा मारून उसाच्या शेतातील गांजाची झाडे जप्त केली.

एक लाख 26 हजार 145 रुपये किमतीची 25 किलो गांजाची झाडे तासगाव पोलिसांकडून जप्त करण्यात आली. याप्रकरणी बोबडे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.