हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या घोषणेवर शेतकरी नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजचा दिवस काळा दिवस आहे. असे म्हणावे लागेल. कारण शेतकऱ्यांना जे या कायद्याने स्वातंत्र्य मिळणार होते ते हिरावून घेतले गेले आहे. मूठभर दलाल आडती यांचा विजय झाला आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने शेतकरी जिंकला असे बोलले जात आहे. मात्र, तो हरला आहे. आज आडत व्यापारी, दलाल जिंकले आहे. पंतप्रधानांच्या निर्णयामुळे शेतकरी हारला आहे. त्याचा पराभव झाला आहे. पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेश शेतकरी मार्केट कमिटी भोवती बाजारपेठ फिरत असते, त्यांच्या टक्केवारी मिळते.
शेती क्षेत्रात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. त्यात आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून आता संधी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱयांनी जल्लोष साजरा करताना विचार करावा, असे शेतकरी नेते खोत यांनी म्हंटले आहे.