मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबानी आणि अदानी- अशोक ढवळेंची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकरी आक्रमक झाला असून मुंबई मध्ये शेतकऱ्यांनी किसान मोर्चा काढला आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले.

यावेळी शेतकरी नेते अशोक ढवळेंचा मोदी-शाहांवर घणाघात, मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबनी आणि अदानी आहेत. मोदी- शाहांनी देशातील सर्व विकायला काढलं, आता हे शेतकऱ्यांना विकायला काढत आहेत. यापुढे म्हणजे त्यांनी देशच विकायला काढला आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाही असेही अशोक ढवळे म्हणाले.

दरम्यान, अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनावर घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची देखील आहे. राज्याच्या राज्यपालांकडे जाण्याचा आम्हाला अधिकार आहे. शेतकरी त्यांचं म्हणनं राज्यपालांकडे जायचं आहे. राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देऊ, असं अजित नवले म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

You might also like