रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे; रघुनाथ पाटलांची सडकून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला होता. यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. “रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही”, अशी घाणाघाती टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunathdada Patil ) यांनी केले आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ते बोलत होते. (delhi farmers protest)

शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेने 28 नोव्हेंबरपासून ‘जनप्रबोधन यात्रा’ सुरु केली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही जनप्रबोधन यात्रा पुणे जिल्ह्यात पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे सध्या यात्रा आलेली आहे. यावेळी पाटील यांना रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता पाटील यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली. रघुनाथदादा पाटील म्हणाले की, “दानवे कधी शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात, तर कधी वेगवेगळी वक्तव्ये करतात. हा माणूस जोड्याने मारायच्या लायकीचा आहे. त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. भारतीय जनता पक्ष बुडवण्यास रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जबाबदार आहेत”.

पाटील म्हणाले की, “पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठी दानवे अशा प्रकारची वक्तव्ये करतात. परंतु अशा प्रकारचं वक्तव्य करणं पक्षाच्या फायद्याचे आहे की तोट्याचे, याचा विचार ते कधीच करत नाहीत. परंतु पक्षाचे अध्यक्ष अशा नेत्यांना पक्षात ठेवतात. पक्षात मोठी पदं देतात. त्यांना केंद्रीय मंत्रीपदं दिली जातात. पक्षाने आता अशा लोकांबाबत विचार करुन निर्णय घ्यायला हवा. अशा वाचाळवीरांनी आतापर्यंत अनेक पक्षसंघटना बुडवल्या आहेत”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

 

Leave a Comment