मविआ सरकारच्या मुर्दाड धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा बळी; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवाळीच्या तोंडावर सुरु झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या स्पाबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे सूत्रही सुरु आहे. दरम्यान निलंगा आगारातील यांत्रिक कर्मचारी शिरपूर शिवकुमार यांचे निलंबनाच्या भीतीने निधन झाले. यावरून शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली आहे. “मविआ सरकारच्या मुर्दाड धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा ४५ वा बळी गेला आहे. निलंगा आगारातील यांत्रिक कर्मचारी शिरपूर शिवकुमार यांचे निलंबनाच्या भीतीने निधन झाले, याला आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे खोत यांनी म्हंटले आहे.

शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ट्विट करीत महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. यापूर्वी त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली होती. आज पुन्हा खोत यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, “मविआ सरकारच्या मुर्दाड धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा ४५ वा बळी इतकी संख्या झाली आहे. निलंगा आगारातील यांत्रिक कर्मचारी शिरपूर शिवकुमार यांचे निलंबनाच्या भीतीने निधन झाले. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो! शिरपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, ” असे खोत यांनी म्हंटले आहे.

दरम्यान यापूर्वी परिवहनमंत्री अनिल परब यांनी काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. पडळकर व खोत यांच्या नेतृत्वात शेकडो एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना मुंबईत आणले आहे. कर्मचाऱ्यांना आम्ही सातत्याने चर्चेसाठी आवाहन केले. मात्र, एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत हे आंदोलन आता नेतृत्वहीन झाले असल्याचे परब यांनी म्हंटले होते.

You might also like