पोलिसांनी खिळे ठोकलेल्या जागेवरच आता फुलं लावणार; २ ट्रक मातीही गावाकडून मागवली! – राकेश टिकैत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७३ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आंदोलन स्थळावर शेतकऱ्यांशी युद्ध करण्याचाचं पवित्रा घेतला. दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळी तटबंदी करत वाटेत अनेक अडथळे निर्माण केले. पोलिसांनी सिमेंटच्या भिंती उभारत दिल्लीच्या सीमांवर मोठे खिळे ठोकून आंदोलन स्थळापर्यंत कोणी पोहोचूच नये अशी तयारी प्रशासनाकडून करण्यात आली.

खिळे ठोकलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देश-विदेशातून मोदी सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांच्या वाटेत ठोकलेल्या खिळ्यांवर संसदेतही सरकारची किरकिरी झाली. यानंतर आंदोलस्थळावरील आता वाटेतील हे खिळे प्रशासनाने काढून टाकले. पण आता या खिळे ठोकलेल्या जागेवरच फुलं लावणार असल्याची घोषणा अखिल भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.

शेतकरी आंदोलनाचे केंद्र आता गाझीपूर बॉर्डर बनलं आहे. या ठिकाणाहून राकेश टिकैत यांनी घोषणा करताना म्हटलं कि, ”गाझीपूर बॉर्डरवर ज्या ठिकाणी पोलिसांनी खिळे ठोकले होते. त्या ठिकाणी आपणं फुलं लावणार आहोत आणि त्यासाठी 2 ट्रक माती मागवल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, गाझीपूर बॉर्डरवर लावलेले खिळे काढतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानंतर, ”आम्ही सध्या रस्त्यांवरील खिळे काढत आहोत. पण जिथे गरज भासेल तिथे ते पुन्हा लावले जातील. तर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षाव्यवस्था जैसे थे राहील असं पोलिस उपायुक्त दीपक यादव यांनी म्हटलं आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment