व्वा रे पठ्ठ्या! म्हणुन या शेतकऱ्याने गायीला केले हॅलिकोप्टरने एअरलिफ्ट 

cow airlifted
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरामध्ये किंवा अगदी दूर्गम भागांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना हवाई मार्गाने सुरक्षित स्थळी हलविल्याची माहिती आपण सर्वाना आहे.  असे अनेक व्हिडीओ देखील आपण पाहिले आहेत. मात्र आता एका वेगळ्या  कौतुकास्पद रेस्क्यू बद्दलची माहिती समोर आली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या गायीला सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी तिला हेलिकॉप्टर ने रेस्क्यू केल्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे. स्वित्झर्लंड मधील एका शेतकऱ्याचे त्याच्या या कृतीमुळे कौतुक होताना दिसत आहे तर अनेकजण यावर आश्चर्य देखील व्यक्त करत आहेत.

या शेतकऱ्याच्या गायीला पायाला जखम झाली होती. आलप्स पर्वतांमधून या गायीला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे या व्हिडिओमधून दिसून येते आहे. पायाला जखम झाल्यामुळे  तिला डोंगराळ भागामधून चालत पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नेल्यास जखम आणखीन गंभीर होऊ शकते अशी शक्यता अदिसून आली म्हणून शेतकऱ्याने गायीला एअरलिफ्ट करण्याचं ठरवलं.  याचा व्हिडीओ खूप कमी काळात व्हायरल झाला आहे. या देशात गायींवर खूप प्रेम केले जाते अशा काही प्रतिक्रिया समोर येत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=gVILO4TnCX4&feature=emb_logo 

आपल्या गायीची काळजी करणाऱ्या शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. तसेच हेलिकॉप्टर मधून उचलल्यानंतरही गाय शांत कशी राहिली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गायीच्या डाव्या पायाला अगदीच काहीच ताण न देता किती काळजीपूर्वक गायीला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आल्याचे विशेष कौतुक होते आहे.